ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे निधन 

निसर्गाचे सौंदर्य शब्दातून समृद्ध करणारा कवीने घेतला जगाचा निरोप

जेष्ठ साहित्यीक आणि राणकवी ना. धो. महानोर यांचे आज सकाळी पुणे येथे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

 
ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे निधन 


निसर्गाचे सौंदर्य शब्दातून समृद्ध करणारा कवीने घेतला जगाचा निरोप

 

 

 

जेष्ठ साहित्यीक आणि राणकवी ना. धो. महानोर यांचे आज सकाळी पुणे येथे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते.

 


 काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना किडणीचा त्रास होता. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वाला धक्का बसला आहे. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असे. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. मराठी कवीता आणि गीते यांमध्ये येणारे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले. खास करुन नामदेव धोंडो महानोर असे पूर्ण नाव असलेला हा कवी खरा प्रगतीशील शेतकरी म्हणूनही ओळखला जात असे.
१६ सप्टेंबर १९४२ मध्ये जन्मलेल्या ना.धो. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला आहे.

ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह होते.

१९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार म्हणून देखील ना.धो. महानोर यांनी काम पाहिलं आहे.

 


महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला.

कवितेतून माती, शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करून दिली. त्यांच्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' ‘रानातल्या कवितां' आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला

 

Review