भारत बांगलादेश सामन्याचे बाराशे चे तिकीट बारा हजाराला विकणाऱ्या दोन दलालांना अटक

पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे भारत विरुद्ध बांग्लादेश या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे जास्त दराने तिकीट विक्री करणाऱ्या दलालांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे.

भारत बांगलादेश सामन्याचे बाराशे चे तिकीट बारा हजाराला विकणाऱ्या दोन दलालांना अटक


पिंपरी चिंचवड  : पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे भारत विरुद्ध बांग्लादेश या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे जास्त दराने तिकीट विक्री करणाऱ्या दलालांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा यांच्यावतीने ही मुकाई चौक, रावेत येथे बुधवारी (दि. 18) रात्री  ही कारवाई करण्यात आली आहे.  या प्रकरणी तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना तिकिटे पुरवणाऱ्या त्यांच्या साथीदाराच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 
भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला सामना आज (गुरुवारी, दि. 19) दुपारी दोन वाजता येथे सुरु होणार आहे.भारत विरुद्ध बांग्लादेश गहुंजे स्टेडियम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय  क्रिकेट सामन्याचे तिकीट 1200/- रुपये दाराचे तिकीट 12,000/- रु. किंमतीस, 1 जास्त दराने काही दलाल विक्री करीत आहेत.  अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा कडील पोलीस अधिकारी व अंमलदार सापळा रावेत हद्दीत अटक केली आहे.


रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने ही तिकिटे पुरवली असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे या तिघांवर रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना 30 ऑक्टोबर पर्यंत कोठारी सुनविण्यात आली आहे

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. सध्या वेशातील पोलीस मागील काही दिवसांपासून स्टेडीयम आवारात गस्त घालत आहेत. दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली की, मुकाई चौक, रावेत येथे कोहिनूर सोसायटीच्या समोर काही दलाल क्रिकेट सामन्याची तिकिटे जास्त दराने विकत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांनी केली  आहे.

Review