इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात; कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

मागील दोन आठवड्यापासून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. या युद्धाचे पडसाद आता पुणे शहरातही उमटले आहेत. या दोन्ही देशांच्या युद्धाच्या पार्श्भूमीवर पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हा प्रकार हाणून पाडला. या प्रकरणी पुणे शहरातील कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इस्त्राईल देशाच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिकृती असलेले स्टीकर रस्त्यांवर पायदळी येतील या उद्देशाने चिटकवल्याचे समोर आले आहे. मात्र, पुणे पोलिसांनी काही वेळातच हा प्रकार उघड करत अशाप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 
 तब्बल ४ गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पुण्यातील लष्कर, समर्थ तसेच खडक व कोंढवा पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लष्कर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी ६ आरोपी निष्पन्न अशाप्रकारे केले आहेत.

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर इस्रायलने हमास संघटनेच्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. याचे पडसाद संपूर्ण जगात उमटताना दिसत आहेत. याच मुद्यावरून पुणे शहरातही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी कोंढवा, लष्कर, खडक व समर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही जणांकडून रस्त्यांच्यामधोमध इस्त्राईल देशाच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिकृती असलेले स्टीकर चिटकवण्यात आले होते.मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन हे स्टिकर काढले आणि सबंधितावर गुन्हे दाखल केले

Review