अंबादस दानवे यांना पिंपरी चिंचवड मध्ये मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झंडे - कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येणारे विरोध पक्षनेते आमदार अंबादस दानवे यांना आज विरोध करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड करण्यात आली , अंबादस दानवे पिंपरी चिंचवड शहरात येणार असल्याने मराठा समाजाच्या कारीरकर्त्यांकडून त्याना विरोध दर्शविण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते पिंपरी चौकात आंदोलन करण्याच्या तयारीत होते, मात्र आंदोलणापूर्वीच मराठा कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले
अंबादस दानवे यांना पिंपरी चिंचवड मध्ये मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झंडे - कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तापू लागला असल्याने जागोजागी नेत्यांना विरोध करण्याची मराठा कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. त्यामुळे सकल मराठा सांजच्या वतीने नेत्यांना गावागावत येऊ देणार नाही तसेच आरक्षण मिळत नाही तो पर्यन्त नेत्यांचे जाहीर कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका मराठा सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येणारे विरोध पक्षनेते आमदार अंबादस दानवे यांना आज विरोध करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड करण्यात आली , अंबादस दानवे पिंपरी चिंचवड शहरात येणार असल्याने मराठा समाजाच्या कारीरकर्त्यांकडून त्याना विरोध दर्शविण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते पिंपरी चौकात आंदोलन करण्याच्या तयारीत होते, मात्र आंदोलणापूर्वीच मराठा कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले . त्यानंतर अंबादस दानवे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाजवळ येताच मराठा समजच्या महिला आणि पुरुषांतर्फे काळे झंडे दाखविण्यात आले, यावेळी देखील पोलिसांनी महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
आज पिंपरी चिंचवड सहहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात विरोधी पक्षनेते आमदार अंबादस दानवे यांचा नियोजित दौरा होता. दुपारी 2 वाजता अंबादस दानवे हे रुग्णालायला भेट देण्यासाठी येणार होते. मात्र दुसरीकडे मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे कार्यकर्ते अंबादस दानवे यांना विरोध दर्शविण्याच्या तयारीत होते . मात्र त्यापूर्वीच पिंपरी पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. आणि विरोध करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते .
दुपारी चार वाजेच्या सुमारास विरोधी पक्षनेते अंबादस दानवे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट देण्यासाठी पोहचले होते. मात्र तेव्हा देखील मराठा समाजाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी दानवे यांना काळे झंडे दाखवत विरोध दर्शविला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी दानवे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसानी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.