भाजीपाला कचऱ्याच्या नावावर गांजाची अवैध वाहतूक - आयटी नगरी हिंजवडीत पकडला 31 किलो गांजा 

पिंपरी चिंचवड शहरात गांजा ची अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्याच्या अनेक घटना उघड होत आहे.याच अनुषंगाने हिंजवडी आय टी नगरी मध्ये 
भाजीपाल्याच्या कचऱ्याच्या नावाखाली गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी आरोपींकडून 31 किलो गांजा जप्त केला आहे.

भाजीपाला कचऱ्याच्या नावावर गांजाची अवैध वाहतूक - आयटी नगरी हिंजवडीत पकडला 31 किलो गांजा 

 

पिंपरी चिंचवड शहरात गांजा ची अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्याच्या अनेक घटना उघड होत आहे.याच अनुषंगाने हिंजवडी आय टी नगरी मध्ये 
भाजीपाल्याच्या कचऱ्याच्या नावाखाली गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी आरोपींकडून 31 किलो गांजा जप्त केला आहे.

मैनुद्दीन अब्दुल सत्तार (वय 23, रा. हिंजवडी. मूळ रा. बिहार), बिपलभ बिधन राणा (वय 24, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विण्यकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या व्यवसायांवर आणि नशेच्या पदार्थाच्या विक्रीवर बारिकीने लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्याचे अंमलदार रवी पवार यांना गस्त घालताना माहिती मिळाली की, वाकडकर वस्ती येथे एक व्यक्ती टेम्पो (एमएच 14/एचयु 2553) मधून गांजा विक्रीसाठी येणार आहे.रवी पवार यांनी तात्काळ माहिती वरिष्ठांना कळवली. आणि त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी वाकडकर वस्ती येथे आरोपीला पकडण्यासाठी सापळा लावला. वाकड ब्रिजकडून एक संशयित टेम्पो घेऊन आला असता पोलिसांना त्याच्यावर संशय झाला आणि पोलिसांनी त्याला थांबवत चौकशी करण्यात आली.
सुरुवातीला टेम्पो चालकाने टेम्पोमध्ये भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली. त्यामध्ये गांजाचे 17 पुडे आढळून आले.पोलिसांनी 31 किलो 100 ग्राम गांजा आणि टेम्पो असा एकूण 14 लाख 38 हजारांचा मुद्देमाल  जप्त करत टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहायक फौजदार महेश वायबसे, पोलीस अंमलदार संतोष डामसे, रवी पवार यांनी केली.

आयटी नगरी असल्याने हिंजवडी परिसरात देश विदेशातून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आणि नोकरीसाठी येत असतो. त्यामुळे या भागात अवैध पद्धतीने गांजा , तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री होत असल्याचं देखील दिसून येत आहे. त्याच बरोबर गुप्त पद्धतीने स्पा च्या नावावर या परिसरात मोठ्या प्रमाणात वैश्याव्यवसाय चालवला जातो.पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अनेक कारवाया आता अपर्यंत झक्या आहेत मात्र तरीही आरोपींचे मनसुभे कायम आहेत. आशा आरोपींवर योग्य ती कारवाई कधी होणार आणि अवैध धंद्याना चाप कधी बसणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

Review