धक्कादायक : साफसफाई बेतली 17 वर्षीय तरुणाच्या जिवावर : ओढवला मृत्यू 

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यादरम्यान जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दिवाळीची साफ-सफाई करणे हे एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल आहे. फटक्याच्या दुकानात साफसफाई करत असताना तरुणाचा विजेच्या तारेवर पाय पडला आणि विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे, ही घटना मंगवारी दुपारी भुसावळ शहरात घडली आहे. 

धक्कादायक : साफसफाई बेतली 17 वर्षीय तरुणाच्या जिवावर : ओढवला मृत्यू 


विजयादशमी नंतर आता सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू झाली आहे, सर्वत्र साफसफाईची कामे सुरू आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे.  मात्र जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यादरम्यान जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दिवाळीची साफ-सफाई करणे हे एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल आहे. फटक्याच्या दुकानात साफसफाई करत असताना तरुणाचा विजेच्या तारेवर पाय पडला आणि विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे, ही घटना मंगवारी दुपारी भुसावळ शहरात घडली आहे. 

सुनील चव्हाण (वय 17 वर्ष , राहणार , मन्यारखेडा , ता . भुसावळ जळगाव ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

काय घडली नेमकी घटना ?
मृत सुनील चव्हाण हा भुसावळ मधील राजकांल तकीज जवळ असलेल्या अनिल अग्रवाल यांच्या फटाक्याच्या दुकानात कामाला होता. मंगळवारी दुकान मालक अनिल यांनी सुनील ला घरी साफ सफाईसाठी पाठवलं. त्याच्यासोबत आणखी एक सागर नावाचा मुलगा साफ सफाईच्या कामासाठी आला होता. सुनील आणि सागर हे देाघेही अग्रवाल यांच्या घरी सफाई करत होते. मोकळ्या प्लॉटमधील गवत काढताना सुनील चा पाय उघड्या विजेच्या तारेवर पडला आणि त्याला जोरात विजेचा धक्का बसला. हा शॉक एवढा भयंकर होता कि यामध्ये त्याचे कपडे जळाले आणि त्याच्या मानेलाही गंभीर दुखापत झाली. सुनील खाली कोसळताच मृत पावला . 

यानंतर सुनीलला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले . मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले . सुनीलचे आई-वडील लहान बहिणीला घटनेची माहिती कळताच, ते रुग्णालयात धावत आले. मुलाचा मृत्यू झाल्याचे ऐकताच परिवाराने आक्रोश केला. या दुर्घटनेमुळे मृत सुनीलच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.  संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करत असल्यानं सुनील हा मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. आपला तरुण पोरगा गमावल्याने चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

Review