धक्कादायक : पुण्यात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर आरपीएफ जवानाने केला अत्याचार
लोहमार्ग पोलिसांनी जवानाविरुद्धात गुन्हा दाखल
पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक अल्पवयीन मुलीवर आरपीएफ जवनाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केले आहेत . अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा मनात घेऊन घर सोडून आरोपिसोबत छत्तीसगडहून पुणे येथे आली होती . मात्र आरपीएफ जवानाने त्या अल्पवयीन मुलीला पाच दिवस एका खोलीत डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या वडिलांनी तिची सुटका केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. दरम्यान याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी जवानाविरुद्धात गुन्हा दाखल केलाय.

लीलाधर ठाकूर असे आरोपीचे नाव आहे, लीलाधार हा रेलवेमध्ये आरपीएफ जवान या पदावर कार्यरत आहे .
पीडित मुलगी दहावीमध्ये शिकते. ती आणि तिचं कुटुंब छत्तीसगडमधील राज्यात राहतं. शाळेत शिकत असताना तिचं लीलाधर ठाकूर नावाच्या मुलावर प्रेम जडलं. दोघांनी लग्न करण्याचं वचन एकमेकांना दिलं. लीलाधर ठाकूरने तिला सांगितलं की तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. पुण्यात जाऊन आपण लग्न करू अशी बतावणी त्याने केली.
लीलाधरच्या या प्रेमी गोष्टींना पीडिता भाळली आणि तिने त्याच्यासोबत घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी १२ सप्टेंबर रोजी पुणे गाठलं. पुणे रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर त्याच्या जवळ तीन व्यक्ती आल्या. त्यांनी त्यांना हटकलं. त्यानंतर त्यांनी या दोघांना पोलिसांकडे नेले. तेथे अनिल पवार नावाचा पोलीस कर्मचारी होता. अनिल पवार याने पीडित मुलगी आणि लीलाधर ठाकूर याला बराच वेळ बसवून ठेवले. त्यानंतर रेल्वे जवान अनिल पवार याने या दोघांना रेल्वे कॉलनीतील एका खोलीत कैद केले. या दोघां त्याने पैश्याची मागणी केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बाहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर कमलेश आणि अनिलने लीलाधरला सोडून दिले. मात्र पीडितेला तेथेच डांबून ठेवले. त्यानंतर पवार आणि तिवारी हे तिच्यावर बलात्कार करत राहिले. दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांना त्याची मुलगी पुण्यात असल्याची माहिती झाली. ते छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि पीडितेची सुटका केली. घरी गेल्यानंतर तिने छत्तीसगड पोलिसांना आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती सांगितली.