महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तणाव, काँग्रेस आक्रमक पवित्र्यावर!

महाविकास आघाडी (मविआ) मध्ये जागावाटपावरुन तीव्र तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आधीच मविआत ही धुसफूस सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तणाव, काँग्रेस आक्रमक पवित्र्यावर!

महाविकास आघाडी (मविआ) मध्ये जागावाटपावरुन तीव्र तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आधीच मविआत ही धुसफूस सुरू झाली आहे. दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जागावाटपावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली झुकणार नाही. काँग्रेसने ज्या जागांवर दावा केला आहे त्या त्यांना मिळवूनच घ्यायच्या आहेत.

संजय राऊत यांनी केवळ दोन-तीन जागांवरच मतभेद असल्याचे सांगितले आहे. पण विदर्भातील जवळपास 12 जागांवर आणि काही मुंबईतील जागांसाठीही ठाकरे गट आणि काँग्रेस आग्रही आहेत. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी सुरू आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे की, शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली झुकणार नाही. काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, ज्या जागांवर काँग्रेसचा कॅंडिडेट 100% निवडून येऊ शकतो, त्या जागा सोडायच्या नाहीत. काँग्रेस जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी दिल्ली वारी केली होती. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना सोबत राहायचे आहे, पण त्यांची बार्गेन पावर वाढवून राहायची आहे. म्हणूनच काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, ज्या जागांवर तिढा कायम आहे, त्याची चर्चा लांबणार आहे. शिवसेनेचीही अशीच भूमिका आहे. शिवसेनेलाही आघाडीत राहण्याचा इच्छा आहे, पण लोकसभेतील परफॉर्मन्स पाहता विधानसभेत तशी स्थिती नाहीये. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आक्रमकपणे बोलत असले तरी आदित्य ठाकरेंनी मवाळ भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा महत्त्वाचा आहे. आघाडी टिकवणे महत्वाचे आहे. एक एक जागा निवडून आणणे महत्त्वाचे आहे. आता नेमकं काय होणार, कोण आपला दावा सोडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Review