सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचे लग्न जवळ येत आहे!
सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचे लग्न जवळ येत आहे!
तेलुगू अभिनेता नागा चैतन्य पुन्हा लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. तीन वर्षांपूर्वी समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांनी साखरपुडा केला आणि आता त्यांचे लग्न जवळ येत आहे. नुकतेच त्यांचे लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले. सोभिताने तिच्या प्री-वेडिंग समारंभाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या विधींमध्ये सोभिताने पारंपरिक रेशमी साडी परिधान केली होती आणि ती आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रपरिवाराने वेढली होती. तीने वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श करून, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि पारंपरिक रीतीप्रमाणे तिने हळदीचे वाटणही केले.
सोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नापूर्वीच्या काही विधींचा समारंभ विशाखापट्टणममध्ये पार पडला. सोभिताने या प्री-वेडिंग सोहळ्याचे फोटो शेअर केले असून, त्याला “गोधुम राई पसूपू दंचटम ands सो इट्स बिगिन्स!” अशी कॅप्शन दिली होती. सोभिताने दिलेल्या कॅप्शनमधील ‘गोधुम’ म्हणजे गहू, ‘राई’ म्हणजे दगड, ‘पसूपू’ म्हणजे हळद, तर ‘दंचटम’ म्हणजे कांडणे किंवा वाटणे. या वाक्याचा साधारण अर्थ “दगडाच्या साह्याने गहू, आणि हळद एकत्र वाटणे” असा होतो. या विधीला तेलुगू लग्नांमध्ये विशेष महत्त्व असते. या विधीमध्ये वधू आणि वर मिळून गहू, हळद आणि इतर काही घटक दगडावर वाटतात. हा विधी त्यांच्या एकत्रित जीवनाची सुरुवात दर्शवतो; जिथे ते दोघे मिळून जबाबदाऱ्या सांभाळतात, एकमेकांबरोबर काम करतात आणि त्यांच्या नवीन जीवनाच्या प्रवासासाठी तयार होतात.
या पारंपरिक विधीचा अर्थ म्हणजे एकता, सहकार्य आणि विवाहात दोघांनी मिळून सुसंवाद साधत जीवन जगणे असा आहे. तेलुगू लग्नांमधील अनेक विधींमध्ये हा विधी नवरा-नवरीच्या एकत्रिततेचा आणि सहजीवनाचा प्रतीकात्मक महत्त्वाचा भाग आहे. सोभिताच्या चाहत्यांनी तिला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. “खूपच सुंदर आणि कलात्मक,” असे एका चाहत्याने लिहिले. तर, “तुम्ही किती सुंदर दिसत आहात,” अशी कमेंट दुसऱ्या एका चाहत्याने केली.
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व अभिनेता नागा चैतन्य ही मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. २०१७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर अवघ्या चार वर्षांनी २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०१७ मध्ये त्यांनी लग्न केले. तब्बल चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागा चैतन्यचे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी जोडले जाऊ लागले.