“महाराष्ट्राची हास्यजत्रा” फेम निखिल बनेची हॉरर कॉमेडी वेब सीरिज 'पौर्णिमेचा फेरा' लाँच!

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेले निखिल बने आता ओटीटी विश्वात पदार्पण करत आहेत. त्यांची नवीन वेब सीरिज 'पौर्णिमेचा फेरा' ही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

"महाराष्ट्राची हास्यजत्रा" फेम निखिल बनेची हॉरर कॉमेडी वेब सीरिज 'पौर्णिमेचा फेरा' लाँच!

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेले निखिल बने आता ओटीटी विश्वात पदार्पण करत आहेत. त्यांची नवीन वेब सीरिज 'पौर्णिमेचा फेरा' ही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही हॉरर कॉमेडी वेब सीरिज आहे, ज्यात निखिल बने सोबत मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर, दीपा माळकर, चंदनराज जामदाडे, स्नेहल आयरे, आणि दर्शना पाटील या कलाकारांनी काम केले आहे.

ही सीरिज शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित केली गेली आहे आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'पौर्णिमेचा फेरा' ही तीन मित्रांची कहाणी आहे, जे त्यांच्या मित्राच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी भेट देतात. त्यांचा हा प्रवास, घडलेल्या घटना, आणि त्यात दडलेली रहस्ये यात प्रेक्षक रमतील. या वेब सीरिजचे चित्रीकरण मुंबईमधील काही भागांत आणि कोकणातील गुहागर येथे झाले आहे.

प्रोडक्शन फिल्म्सच्या पायल कदम यांनी सांगितले की, "या वेबसीरिजचा जॉनर हॉरर कॉमेडी असून हा जॉनर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'पौर्णिमेचा फेरा' चे वैशिष्ट्य म्हणजे या कथेत रहस्य, रोमांच, भीती असतानाच त्याला कॉमेडीचा टच देण्यात आला आहे. खात्री आहे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल."

Review