लॉरेन्स बिश्नोईच्या एन्काऊंटरसाठी 1 कोटीची घोषणा करणाऱ्याला दीड कोटींची सुपारी!

राज शेखावत यांच्यावर जीवघेणी धमकी, बिहारमध्ये सुपारी दिल्याचा दावा

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे.दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा क्षत्रिय करणी सेना प्रमुख राज शेखावत यांनी केली होती. या घोषणेची चर्चा सुरु असताना आता त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नाई गँगने आपल्या नावाची सुपारी दिल्याचा दावा राज शेखावत यांनी केला आहे. बिश्नाई गँगने बिहारमध्ये ही सुपारी दिल्याचे राज शेखावत यांनी म्हटले आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या एन्काऊंटरसाठी 1 कोटीची घोषणा करणाऱ्याला दीड कोटींची सुपारी!

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे.दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा क्षत्रिय करणी सेना प्रमुख राज शेखावत यांनी केली होती. या घोषणेची चर्चा सुरु असताना आता त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नाई गँगने आपल्या नावाची सुपारी दिल्याचा दावा राज शेखावत यांनी केला आहे. बिश्नाई गँगने बिहारमध्ये ही सुपारी दिल्याचे राज शेखावत यांनी म्हटले आहे.

राज शेखावत यांनी अलिकडेच घोषणा केली होती की, कोणताही पोलीस कर्मचारी लॉरेन्स बिश्नोई गँगचे एन्काऊंटर करत असेल तर त्यांची संघटना त्याला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपये देईल. तसेच, क्षत्रिय करणी सेना त्या पोलीस कर्मचाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेईल आणि प्रत्येक गरजा पूर्ण करेल. क्षत्रिय करणी सेनेचे कोट्यवधी सदस्य आहेत. त्या लोकांनी पाच-पाच पैसे दिले तरी एक कोटी रक्कम सहज जमा होईल, असेही शेखावत यांनी म्हटले होते.

एका युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत राज शेखावत यांनी सांगितले की, "जेव्हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा विरोध केला.तेव्हा मला अनेक धमक्या आल्या. लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य मला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. त्या लोकांनी माझी सुपारी दिल्याची मला माहिती मिळाली आहे. बिहारमधील सिवान येथील ओसामा खान यांना दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित काम झाल्यानंतर दिली जाणार आहे. ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आहे." दरम्यान, ही सुपारी लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करण्याचे बक्षीस जाहीर झाल्यानंतर दिली होती की, त्यापूर्वी दिली होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

पुढे राज शेखावत यांनी म्हटले की, धमक्या मिळत असल्यानंतरही मी आपल्या वक्तव्यावर कायम आहे. मला कोणतीही भीती वाटत नाही. जन्म आणि मृत्यू देणे हे ईश्वराच्या हातात आहे. ज्या व्यक्तीला मला मारण्यासाठी पाठवला होता, तो माझा समर्थक निघाला. त्याने येऊन मला ही सर्व माहिती दिली. तसेच, सुखदेव गागामेडी यांच्या हत्येमुळे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सर्व सदस्यांचे एन्काऊंटर करण्याची आम्ही मागणी करत आहोत, असे राज शेखावत यांनी सांगितले. याशिवाय, लॉरेन्स बिश्नोईकडे शूटर्स आहेत? यावर राज शेखावत म्हणाले, "करणी सेनेपेक्षा मोठी सेना देशात कुठेच नाही. माझ्याकडे कोट्यवधी करणी सैनिक आहे.आम्ही कोणाला घाबरत नाही."

Review