नीना कुळकर्णींच्या मृत्यूची अफवा पसरली
अभिनेत्रीने स्वत: पोस्ट करून केली खोट्या बातम्यांची खंडन
'मी जिवंत आहे...' नीना कुळकर्णींच्या मृत्यूची अफवा; अभिनेत्रीला स्वत: शेअर करावी लागली पोस्ट
मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांचा एक मोठा चाहतावर्ग देशभरात आहे. त्यांनी मराठी-हिंदीमध्ये विविध मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवर काम केले आहे. त्यांच्या चाहतावर्गामध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी पसरल्याचे अभिनेत्रीने सांगितले. नीना यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही खळबळजनक माहिती दिली.
युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सेलिब्रिटींचे आयुष्य तर या प्लॅटफॉर्वर चर्चेत असतेच. अनेकदा सेलिब्रिटींविषयीच्या 'फेक न्यूज' व्हायरल होताaत आणि सामान्य त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ अभिनेत्रीच्या बाबतीत घडला. त्यांच्या मृत्यूची बातमी एका युट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आली होती. त्यावर स्वत: पोस्ट करत अभिनेत्रीने या खोट्या बातम्यांचे खंडन केले आणि त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.
नीना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, 'माझ्या मृत्यूविषयी खोटी बातमी पसरवली जाते आहे. मी जिवंत आहे आणि स्वस्थ आहे. देवाच्या कृपेने कामामध्ये व्यग्र आहे. कृपया अशा अफवांकडे दूर्लक्ष करा आणि अजिबात प्रोत्साहन देऊ नका. मला दीर्घायुष्य मिळो.' नीना कुळकर्णी सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत. त्यांचा 'द सिग्नेचर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाविषयी अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत त्या विविध पोस्ट शेअर करत होत्या. या दरम्यान त्यांनी शेअर केलेली एक इन्स्टाग्राम स्टोरी लक्ष वेधून घेणारी ठरली. शिवाय युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर काहीही व्हायरल होऊ शकते, याविषयी चिंताही निर्माण झाली आहे.