UPSC परीक्षा उत्तीर्ण केली 21 वर्षांची तरुणी

विदुषी सिंह, 21 वर्षांची तरुणी, पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करून सर्वांनाच चकित केले आहे. तिने कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता स्वतः अभ्यास केला आणि अर्थशास्त्र हा विषय निवडून 13 वा रँक मिळवला. विदुषीचे IFS सेवा निवडण्यामागील कारण हे तिच्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करणे आहे. तिच्या यशाचे रहस्य म्हणजे सेल्फ स्टडी आणि अनेक टेस्ट सिरीज आणि मॉक टेस्ट देणे.

21 वर्षांची तरुणीने केला कमाल! कोचिंग शिवाय पास केली UPSC परीक्षा, निवडली IFS सेवा

काही लोक अगदी लहान वयात यशाच्या शिखरावर पोहोचतात. आपली वेगळी ओळख निर्माण करतात. असंच एक प्रेरणादायी उदाहरण आता समोर आलं आहे. IFS विदुषी सिंह हिने वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. विदुषीचा जन्म राजस्थानच्या जोधपूर येथे झाला. विदुषी सिंहची यशोगाथा जाणून घेऊया

यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी विदुषीने कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. स्वत: अभ्यास केला. कॉलेजमध्ये असताना तिने NCERT आणि इतर बेसिक पुस्तकं वाचून आपला पाया मजबूत केला. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा 13 वा रँक मिळवून उत्तीर्ण केली. तिने अर्थशास्त्र हा विषय निवडला होता.

एवढा चांगला रँक मिळूनही विदुषीने आयएएसऐवजी आयएफएस सेवा निवडली. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, भारतीय परराष्ट्र सेवेत सरकारी अधिकारी होण्याचं तिच्या आजी-आजोबांचं स्वप्न होतं. आपल्या यशाचे रहस्य सांगताना विदुषी म्हणाली , यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी तिने अनेक टेस्ट सिरीज आणि मॉक टेस्ट दिल्या. यूपीएससीच्या तयारीमध्ये सेल्फ स्टडी हा अत्यंत महत्त्वाचा आहे 

 

Review